माळेगावात धक्कादायक घटना!… ट्रॅक्टरने पाडले कंपाउंड…

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ट्रॅक्टरने घरासमोरील कंपाउंड पाडून नुकसान केल्याचा आरोप; याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

माळेगाव येथील शिवनगर परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

फिर्यादी अविनाश नरूटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच दगडाने आणि हाताने मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, घरासमोरील कंपाउंड ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी रणजीत ढोले, सुजित ढोले यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक केली असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास माळेगाव पोलीस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

माळेगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.