माळेगाव पोलिसांची धडक कारवाई!.. तब्बल सात बेकायदेशीर घातक शस्त्रे जप्त…

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारवनगर येथे बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे बाळगल्याच्या संशयावरून दादा नथुराम शिंदे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता, आरोपीच्या घरासमोरून पोलिसांनी तीन तलवारी, एक कोयता, एक सत्तुर, एक सुरा आणि एक कुऱ्हाड, अशी एकूण सात शस्त्रे जप्त केली आहेत.

या जप्त शस्त्रांची एकूण किंमत सुमारे १ हजार ६०० रुपये असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४ आणि २५ अन्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जून २०२६ पासून माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत चार अग्निशस्त्रांसह एकूण १२ हत्यारे जप्त करण्यात आली असून, १३ आरोपींवर ८ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.