काऱ्हाटीतील कोयता हल्ला प्रकरणाचा उलगडा; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे

बारामती : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावच्या मुख्य चौकात भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

अमोल सदाशिव जाधव असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह हातावर आणि शरीराच्या इतर भागांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

गंभीर जखमी झालेल्या अमोल जाधव यांच्यावर सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, या प्रकरणात ऋतिक आणि ओंकार या दोघांची नावे समोर आली होती, घटना घडल्यानंतर ते पसार झाल्याची चर्चा सुरू होती. याच दरम्यान सदर हल्ल्याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार, पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता मात्र, हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, वाद नेमका कशातून झाला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग होता याचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध भागांत रवाना करण्यात आली आणि आरोपींना पोलिसांनी भिडे ठोकल्या.

यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी पत्रकारांशी बोलताना घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.