मेकिंग महाराष्ट्र – चेतन शिंदे
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक पाच येथील विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या पाणी बॉटलचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका आरती गव्हाळे-शेंडगे, शहराध्यक्ष बळवंत बेलदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि दैनंदिन गरजांची काळजी घेत, सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
