उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली बारामतीतील विकासकामांची पाहणी!

बारामती : बारामतीच्या विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

पहाटे सहा वाजल्यापासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करण्यास सुरुवात केली.

याच दौऱ्यादरम्यान बारामतीच्या मार्केट यार्ड परिसरातील रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्राच्या सुरू असलेल्या कामाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली.

या प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे आणि प्रकल्पाच्या पुढील नियोजनाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

बारामतीच्या विकासाला अधिक गती देण्याच्या दृष्टीने सुनेत्रा पवार यांच्या या पाहणी दौऱ्याकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

बारामतीतील विकासकामांच्या पाहणीसंदर्भातील आणखी अपडेट्ससाठी पाहत राहा — मेकिंग महाराष्ट्र!