बारामती : बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जनता दरबार घेतला.
या जनता दरबारामध्ये बारामती परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी विविध प्रश्न आणि अडचणी जय पवार यांच्यासमोर मांडल्या.
नागरिकांच्या समस्या जाणून घेत, संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देत जय पवार यांनी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जनता दरबाराच्या वेळी भावनिक क्षणही पाहायला मिळाला.
काही महिलांनी जय पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं. महिलांनी राखी बांधत जय पवार यांच्याप्रती आपुलकी आणि भाऊ-बहिणीचं नातं व्यक्त केलं.
जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी थेट संवाद साधण्याचा जय पवार यांचा प्रयत्न असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
बारामतीतील या जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
