
मेकिंग महाराष्ट्र – बारामती, दि. १५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये १९ जुलै ते २७ जुलै दरम्यान विविध मोफत आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी केले आहे.वैद्यकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महात्मे आयुर्वेदिक आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी नावनोंदणीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या आरोग्य जागर अभियानांतर्गत विविध विशेष तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे असतील उपक्रम,,,









असे असतील उपक्रम,,,मोतीबिंदू शस्त्रक्रिया (बिनटाका) : १९ ते २२ जुलै दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मे ट्रस्टच्या डॉक्टरांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.हर्निया व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया : २२ व २३ जुलै रोजी डॉ. मुफ्तफजल लक्कडवाला व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे.महिला कर्करोग तपासणी : २० ते २७ जुलै दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सर्वरोगनिदान शिबिर : २२ जुलै रोजी सांगवी व पणदरे येथे तसेच २३ जुलै रोजी काटेवाडी व मोरगाव येथे सर्वरोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान शिबिर : शारदा प्रांगण, जीटीएस कंपनी, पणदरे आणि सुपे येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.या उपक्रमांमुळे बारामती तालुक्यातील नागरिकांना विविध आरोग्य सेवांचा मोफत लाभ मिळणार असून, आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.!
