बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंबूत येथे शेतकरी कृती समितीच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, परिसरातील असंख्य सभासद आणि कार्यकर्ते मेळाव्यासाठी उपस्थित झाले आहेत.
मेळाव्याची सुरुवात दिवंगत अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सभासद व कार्यकर्त्यांनी अजितदादांना अभिवादन केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकरी कृती समितीची आगामी भूमिका, निवडणुकीतील रणनीती आणि सभासदांशी संबंधित विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सतीश काकडे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या मेळाव्यासाठी निंबूतसह परिसरातील मोठ्या संख्येने सभासद आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंबूत परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मेळाव्यातून शेतकरी कृती समितीच्या आगामी निवडणूक भूमिकेबाबत कोणती दिशा स्पष्ट होते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
