बारामती : रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज बारामतीतील तिरंगा सर्कल परिसरात अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
दिवंगत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बारामतीतील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या लाडक्या दादांना राख्या अर्पण केल्या.
बहिण-भावाच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशीच अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची आठवण बारामतीकरांच्या मनात पुन्हा जागी झाली.
अजितदादांचे त्यांच्या भगिनींशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि बहिणींविषयी असलेला आपुलकीचा भाव लक्षात घेता, अनेक महिलांनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ येत राखी बांधून आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी अनेक बहिणींच्या डोळ्यांत अश्रू होते, तर वातावरणात ‘दादा, तुमची आठवण कायम राहील’ अशी भावनिक भावना जाणवत होती.
रक्षाबंधनाच्या या दिवशी अजितदादांच्या स्मृतींना राखीच्या माध्यमातून अभिवादन करत बहिणींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बारामतीतील हा भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेला.
