मेकिंग महाराष्ट्र – पुणे (प्रतिनिधी) दि १८ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका आयुक्तांच्या निरीक्षण दौऱ्यात शेवाळेवाडी, मांजरी, केशवनगर आणि सर्व महानगरपालिका शाळा, महानगरपालिका कार्यालये आणि स्मशानभूमीत या सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती,

याकरिता स्थळ आयुक्तांच्या निरीक्षण दौऱ्यात पाहणी करण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष. राहुल शेवाळे हे देखील आले होते. वरील मागणीनुसार आज महानगरपालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी दत्ताराम महाडिक, धनंजय नरके, कैलाश दगडे, राजू पैत्रम यांनी

परिसरातील १२ शाळा, चार स्मशानभूमी आणि चार महानगरपालिका कार्यालयांसह स्मशानभूमींना पुणे महानगरपालिका आयुक्तांनी भेट दिली यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे हे देखील कामकाजाचा आढावा बारकाईने घेत होते.

सदर कामकाजाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देखील दिल्या हा अहवाल लवकरच आयुक्तांना पाठवून संबंधित ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक सुरक्षा अधिकारी दत्ताराम महाडिक यांनी उपाध्यक्ष शेवाळे यांना दिली,यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष संदीप लोणकर, स्वीकृत नगरसेवक भूषण तुपे, बाळासाहेब घुले, माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर, अमित घुले, सुमित घुले, महादेव कोडगे, डॉ.अभिजित पवार आदी स्थानिक रहिवासी व मान्यवर उपस्थित होते.
