मेकिंग महाराष्ट्र – बारामतीत शासकीय कागदपत्रांशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे…शासकीय उत्पन्न प्रमाणपत्रासाठी ChatGPT च्या मदतीने बनावट कागदपत्र तयार करून ते शासकीय प्रक्रियेत सादर केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या FIR नुसार, अजिज जाफर सय्यद, रा. खंडोबानगर, बारामती यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 336(2), 336(3), 337, 340(2) आणि 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, संबंधितांनी स्वतःच्या लेखी जबाबात ChatGPT चा वापर करून उत्पन्नाचा दाखला तयार केल्याचे नमूद केले आहे. तसेच हा दाखला शासकीय प्रक्रियेत सादर केल्याचा आरोप आहे.या प्रकरणात तहसील कार्यालयातील कागदपत्रे, कार्यालयीन पडताळणी, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच डिजिटल पुरावे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७ वाजून २१ मिनिटांनी FIR क्रमांक ०३६० नोंदवण्यात आला असून, आता या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.
