मेकिंग महाराष्ट्र – बारामती : अजित पवार यांच्या अकाली निधनाला अद्याप एक महिना पूर्ण झाला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती शहर महिला अध्यक्ष अनिता गायकवाड यांनी पक्ष कार्यालयात वाढदिवसाचा जल्लोष कार्यक्रम साजरा केल्याचा व्हिडिओ मेकिंग महाराष्ट्र न्यूजवर प्रकाशित झाला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शोककाळ सुरू असताना झालेल्या या सेलिब्रेशनवर कार्यकर्ते व नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.अनेकांनी सोशल मीडियावर तसेच स्थानिक पातळीवर संवेदनशीलतेचा अभाव असल्याची टीका केली. “नेतृत्वाच्या दुःखद निधनानंतर संयम व साधेपणा अपेक्षित असताना जल्लोष करणे अयोग्य आहे,” अशी भावना पक्षातील काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पक्षाच्या प्रतिमेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.घटनेची माहिती वरिष्ठ पातळीवर पोहोचताच स्थानिक पातळीवर चर्चा वाढली आणि अखेर या वादाच्या पार्श्वभूमीवर अनिता गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.?यामध्ये हा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला असून अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे देखील समजत आहे.. “घडलेल्या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहे,” असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
