शरद पवारांनी कार्यकर्त्याला प्रचंड गर्दीत नुसती घोषणा ऐकून नामोल्लेख केला..पहा व्हिडिओ

  • मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी.जुन्नर-आंबेगाव – पवारांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. तरी आजही ते कार्यकर्त्यांचे मेळावे, ग्रामपंयाचती, पंचायत समित्यांमध्ये जाऊन लोकांशी थेट संपर्क साधत असतात. अधून-मधून शेतकऱ्यांच्या बांधावर दिसतात. हेच पवारांच्या राजकारणातील यशाचं मुख्य कारण आहे, असं त्यांचे निटवर्तीय सांगतात. दरम्यान, आज (१४ जानेवारी) पुन्हा एकदा शरद पवारांनी त्यांच्या स्मरणशक्तीचा प्रत्यय दिला. पुण्यातल्या जुन्नर-आंबेगावमधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यातील आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारणीकरणाचा उद्घाटन समारंभ आज शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाषण सुरू करण्यापूर्वी घडलेला एक प्रसंग पाहून उपस्थितांनी शरद पवारांच्या स्मरणशक्तीला सलाम केला.
  • शरद पवार भाषणासाठी मंचावर उभे राहिले. तेवढ्यात गर्दीतून एक आवाज आला. हा कार्यकर्ता मोठ्याने घोषणा देत होता. शरद पवार यांनी एका क्षणात त्या कार्यकर्त्याचा आवाज ओळखला. शरद पवारांनी मंचावरून त्या कार्यकर्त्याचा नामोल्लेखही केला. हे पाहून उपस्थितांनी शिट्ट्या वाजवला आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
  • शरद पवार त्यांच्या भाषणाला सुरुवात करणार इतक्यात एका कार्यकर्त्याने ‘पवार साहेबांचा विजय असो…’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…’ अशा घोषणा दिल्या. गर्दीतून ज्या दिशेने आवाज आला तिकडे बोट दाखवत शरद पवार म्हणाले, हे कोंढाजी वाघ आहेत ना? त्यावर उपस्थितांनी होकारार्थी उत्तर दिलं. शरद पवारांची स्मरणशक्ती पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यावर शरद पवार म्हणाले, सभा कुठलीही असली तरी आपले कार्यकर्ते घोषणा देतातच. हे जुन्नरचं वैशिष्ट्य आहे.