दुकानातील आलेल्या स्टील तसेच मार्बलचा लोडिंग ट्रक रस्त्यावरच उभा करून वाहतुकीस करतात अडथळा

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) निलेश निकम – मधल्या काळामध्ये बारामती शहरांमध्ये अपघाताचे प्रमाण बऱ्या प्रकारे वाढले होते यामध्ये युवकांचा अपघातात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे देखील आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले असेल निष्काळजीपणा मुळे हे अपघात झाल्याचे देखील बऱ्याचदा नागरिकांनी सांगितले आहे? या गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आत्ताच्या काळात आहे कारण येणारे सण उत्सव पाहता प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे देखील चित्र आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात असे बरेच अपघात होण्याची चिन्ह आता दिसू लागले आहे बेजबाबदार पणे आपली मोठी रस्त्याच्या कडेला स्टील विक्रेत्यांनी तसेच मार्बल विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत परंतु याकडे आरटीओ राज्य परिवहन विभाग बारामती तसेच पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत. वृत्तपत्राच्या बातमीनंतर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून पुन्हा राजरोजपणे भिगवन रोड वरील ही स्टील व मार्बलचे दुकान मालक जैसे थे ती स्थिती ठेवतात असे देखील स्थानिक नागरिकांनी सांगितले त्यामुळे आता पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणार का? व निष्पक होणाऱ्या अपघाताला आळा बसणार का? हे आता पाहणे गरजेचे आहे..