मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- बारामती शहरासह पूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे खूप मोठी गांभीर्याची बाब आहे सदर घट हि वीर सावरकर जलतरण माळावरची देवी रिंग रोड या ठिकाणी बारामती परिसरामध्ये घडली आहे. सदर घटना ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रचार रॅलीमध्ये घडली असून चार चाकी वाहन रस्त्याने घेऊन जात असताना एडवोकेट अजित बनसोडे यांनी सांगितल्याप्रमाणे अचानक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या पाठीमागून कार्यकर्त्यांनी भरलेल्या चार चाकी वाहनाने पाठीमागून गाडीला धडक दिली त्या धडकेमध्ये गाडीचे नुकसान झाले याचा जाब विचारण्यासाठी. मी आरोपी वाहनचालक. यांच्याकडे गेलो त्या गाडीमध्ये आरोपी अमोल चौगुले तसेच, सुरेश गोसावी हे होते त्यांच्याशी यासंदर्भात बातचीत करत असताना त्यांनी आरेकर्याची भाषा सुरू केली त्यानंतर मी त्यांना सांगितले की मी एक वकील आहे हे सांगून देखील त्यांनी गाडीमधून उतरून मला मारहाण सुरू केली तेथूनच पाठीमागून आणखी एक चार चाकी वाहन आले त्यामध्ये दोन्ही गाड्यांमध्ये एकूण 15 ते 16 पुरुष व महिला होत्या यांनी देखील उतरून मला काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरुवात केली आणि गाडी मधले माझे आंबेडकर जयंती चे डॉक्युमेंट्स कागदपत्रे फाडून टाकून मला शिवीगाळ केली असे फिर्यादीमध्ये एडवोकेट अजित बनसोडे यांनी सांगितले आहे यावर बारामती शहर पोलिसांनी, काही महिलांना ताब्यात घेत असून त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींसह भारतीय दंड संहिता कलम,३२७,१४३,१४७,१४९,२९४,३२३,५०४,५०६, तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८o नुसार,(३)१r (३)१t(३)२va , आणि ६ या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे तरी उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून ते लवकरच अटक करू असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
