केसरी सिलेक्ट कडून श्रीश देशपांडे आणि श्रुती देशपांडे यांना मिळाले अवॉर्ड

मेकिंग महाराष्ट्र बारामती – दि १५ (प्रतिनिधी) केसरी सिलेक्ट या Tailormade itineraries साठी सुप्रसिद्ध असणाऱ्या ब्रँच मध्ये पुर्ण भारतात फिरण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रवाशांची सर्वाधीक बुकींग करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवणाऱ्या श्रीश देशपांडे, श्रुती देशपांडे यांना मिळाले अवॉर्ड या अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांचे सलग सतरावे वर्ष असून बारामती सारख्या तालुका पातळीवर असूनही हा पुरस्कार त्यांना सलग मिळत

असल्याने सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. पुढे श्रीश देशपांडे म्हणाले की या सगळ्याचे श्रेय आमच्या सहकार्यासाठी नेहमीच असणारी आमची संपूर्ण केसरीची मॅनेजमेंट तसेच आमची टीम,आणि बारामती परिसरातील आमच्यावर संपूर्ण विश्वास दाखवणारे आनंदी पर्यटक यांना जाते. त्यामुळे मला हा अवॉर्ड मिळण्याचे आणि बक्षीसहि मिळाले याबद्दल खुप आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय.