केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ;-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बारामती तालुका व शहर..

  • मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) दि.२६ – बारामती मध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा वाढदिवस सलग चार दिवस साजरा करण्यात आला, या कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करत तसेच शासकीय रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच मूकबधिर शाळा या ठिकाणी अन्नदान,आणि विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू गोष्टींचे वाटप करण्यात आले.आयुष्यमान भारत योजना याचे कार्ड काढण्यासंदर्भात कसबा साठेनगर येथे कॅम्प घेण्यात आला. हा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बारामती तालुकाध्यक्ष,संजयजी वाघमारे,सुनील शिंदे , बीजेपीचे संतोष जाधव ,रत्नप्रभा साबळे, पिंकू ताई मोरे, प्रमोद खंडागळे, सीमाताई घोरपडे,BJP चे पल्लवी वायकर,वर्षाताई भोसले तालुकाध्यक्ष ,संतोष जाधव, जयश्री गुंडेजाताई,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बीजेपीचे शहराध्यक्ष वायसे तसेच मुकेश वाघेला,पत्रकार संघटनांचे, योगेश नालंदे अध्यक्ष संपादक पत्रकार संघ, चेतन शिंदे,मन्सूर शेख,तानाजी पाथरकर तसेच,पत्रकार तैनूर शेख , शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका,या कार्यक्रमावेळी आवर्जून उपस्थित होते.