दहीहंडी उत्सव संदर्भात शांतता कमिटी मीटिंग मधे DJ लावण्यास पोलिसांकडून बंदी.!

मेकिंग महाराष्ट्र बारामती : दि २०- बारामती शहरातील दहीहंडी उत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीचे आयोजन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या बैठकीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड हे प्रमुख उपस्थित होते तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सर्व मंडळाच्या अध्यक्षांसह आयोजकांना दहीहंडी उत्सवानिमित्त लावण्यात येणाऱ्या डीजे संदर्भात सूचना केल्या. डीवायएसपी सुदर्शन राठोड यांनी डीजे लावण्यास बंदी घातली असून कोणीही डीजे लावू नये. दोन स्पीकर च्या वर भले मोठे साऊंड उभा करू नये, बारामती शहरातील पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986आणि ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण)कायद्याचे नियम कोणीही मोडू नये. आणि जर कोणी नियम मोडल्या त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे डॉ.सुदर्शन राठोड यांनी सांगितले. या बैठकीमध्ये दहीहंडी उत्सवा संदर्भात अनेक विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आले. त्यामुळे डीजेला पोलीस प्रशासनाकडून कोणतीही परवानगी मिळणार नाही असे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले.या बैठकीमध्ये दहीहंडी उत्सव आयोजक. श्री.ऋतुराज काळे, श्री.अभिजीत काळे, श्री.निलेश इंगवले, एडवोकेट.भार्गव पाटसकर, एडवोकेट.निलेश वाबळे, एडवोकेट विनोद जावळे व सर्वच बारामती शहरातील दहांडी उत्सवाचे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते.