पार्थ पवार म्हणतात,‘मला आमदार,खासदार ’…

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघ निवडला आहे का, निवडणूक लढविणार आहात का असे विचारले असता पार्थ पवार म्हणाले, की मला आमदार किंवा खासदार व्हायचे नसल्याने मी सध्यातरी कोणतीही निवडणूक लढविणार नाही. संघटनेतील कोणतेही पद घेणार नाही. पक्ष वाढविण्यावर माझा भर आहे. भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात दोन आणि पुण्यात एक विधान परिषदेचा आमदार दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शहरात विधान परिषदेची एक आमदारकी द्यावी, अशी शिफारस अजित पवार यांच्याकडे केली आहे. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.