पंचायत समिती निवडणुकीत सोडतापवाडीचे निखिल कांचन रिंगणात;- स्थानिक मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण.!

ऊरुळी कांचन मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी दि.१९- येत्या पंचायतसमिती निवडणुकीसाठी सोरतापवाडी गणातील परिसरातराजकीय हालचालींना वेग आला असून तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांचे नाव चर्चेत आले आहे.

सामाजिक बांधिलकी,लोकसंपर्क व विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे स्थानिकनागरिकांचा निखिल कांचन यांच्यावर वाढता विश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे.काही वर्षांपासून गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रिय असून युवकांना एकत्र करून ग्रामविकासाची दिशा दाखवत

आहेत. गावात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. युवा, उत्साही आणि स्वच्छ प्रतिमेचे युवा नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांना स्थानिक तरुण वर्ग, शेतकरी आणि महिला मंडळांकडून चांगला प्रतिसाद

मिळत आहे. ग्रामविकासासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि लोकसेवा हीच माझी दिशा असेल असे मत इच्छुक उमेदवार निखिल कांचन यांनी व्यक्त केले. पंचायत समिती निवडणुकीत निखिल कांचन यांच्या उमेदवारीमुळे

सोरतापवाडी परिसरातील ऊरुळी कांचन, शिंदवणे, तरडे वळती गावातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांचा कल आणि जनसंपर्क पाहता, ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *