सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारताच नवनाथ बल्लाळ थेट मैदानात; कचरा डेपोला भेट देत कामाला सुरुवात

मेकिंग महाराष्ट्र – बारामती.दि 26 बारामती नगरपरिषदेच्या स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर नगरसेवक नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच तात्काळ कामाला सुरुवात केली आहे.

सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी बारामती शहरातील कचरा संकलन विभाग अर्थात कचरा डेपो येथे प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते. कचरा संकलन, कचऱ्याचे विलगीकरण, शहरातील स्वच्छता व्यवस्था तसेच स्वच्छता कामगारांना उपलब्ध असलेल्या सुविधा याबाबत. नगराध्यक्ष श्री सचिन सातव यांनी आरोग्य विभागांच्या खाते प्रमुखांना पुढील उपाय योजनेसाठी व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. स्वच्छ व आरोग्यदायी बारामतीसाठी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाईल, असे सभापती नवनाथ बल्लाळ यांनी यावेळी सांगितले.