मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरातील भिगो रोड येथे साळोखे नगर,श्वेता आपारमेंट परिसरात अनेक ठिकाणी खुल्यावर मुख्य लाईट कनेक्शनचे पेट्या उघड्यावर असल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सोसायटीत अनेक लहान मुलांचा वावर असतो जाणीवपूर्वक महावितरण कंपनीतील कर्मचारी अक्षय बोरकर हा परिसरातील मुख्य लाईट कनेक्शनच्या पेट्या उघड्या ठेवत असून, सुज्ञान नागरीकांनी या कर्मचाऱ्याला फोन केल्यास तो उडवा उडीचे उत्तरे देऊन टाळाटाळ करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. संबंधित अक्षय बोरकर हा जाणीवपूर्वक लहान मुलांच्या जीवाशी खेळत आहे का. असा सवाल आता महावितरण कंपनीच्या उपअभियंतांना स्थानिक रहिवासी करू लागले आहेत.त्यामुळे या प्रकरणाची महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने दखल घेणे गरजेचे असून जर कोणी लहान मुलाने यामध्ये खेळण्याच्या नादात काही कृत्य केले तर त्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे.
