कोल्हापूर :(मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी) – पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोहोचली आहे. अवघ्या पाच इंचावर धोका पातळी पोहोचली असल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. तर कोल्हापूर शहरांमध्ये महापालिकेने वॉररूम सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम हटायचे नाव घेत नाही. आजही पावसाने धुमाकूळ घातला. शहरामध्ये पावसाची उघडीप होती. दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्याच्या अन्य भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. करवीर, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात पुराचे पाणी येत असल्याने गतीने स्थलांतर होत आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. अनेक ठिकाणी घरे पडण्याचे प्रकार घडले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम हटायचे नाव घेत नाही.
आजही पावसाने धुमाकूळ घातला. शहरामध्ये पावसाची उघडीप होती. दुपारी तीन वाजल्यानंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्याच्या अन्य भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. करवीर, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात पुराचे पाणी येत असल्याने गतीने स्थलांतर होत आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. अनेक ठिकाणी घरे पडण्याचे प्रकार घडले आहेत.
