मेकिंग महाराष्ट्र पुणे : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामध्ये, कुठे होर्डिंग, कुठे झाड तर कुठे वीजा पडल्याच्या घटना घडल्या आहेत.पुणे शहरातील अनेक मार्गावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.तर, काही भागांत पावसाच्या वाहत्या पाण्यात दुचाकी गाड्याही वाहून गेल्याचं दिसून आलं. रस्त्याच्या कडेला, दुकानाच्या बाहेर लावलेल्या दुचाकी पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातानाचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत.त्यामुळे, मान्सनपूर्व पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवल्याचे चित्र दिसून आलं. सोशल मीडियावरही या पावसाचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या पावसामुळे दुकानांमध्ये पाणी गेलं आहे, रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होते. तर, हिंजवडी भागातही पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचल्याचे दिसून आले. पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होते,या पाण्याच्या वेगाने गाड्या देखील वाहून जात होत्या. पुण्यातील स्मार्ट सीटी प्रकल्पाचा भाग असलेल्या बाणेर भागात काही वेळ झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बाणेरमधील बीटवाईज चौकात अनेक वाहनं पावसाच्या पाण्यात अडकली त्यामुळे थोड्यावेळापुरते जनजीवन विस्कळीत झाले
