मेकिंग महाराष्ट्र दि.२० – बारामती शहरामध्ये बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज मतदान आहे.बारामती शहरात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु मतदार मात्र मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे पाहायला मिळत आहे.त्याचे कारण प्रभाग क्रमांक १५ ब मध्ये परिसरात सराईत गुन्हेगार फिरत आहेत.?त्यामुळे प्रभाग १५ बा मध्ये नागरिकांमधील वातावरण भयभीत झाले असून मतदार मतदान केंद्रापर्यंत जाण्यास घाबरत आहेत का.? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.बारामती शहरामध्ये प्रभाग क्रमांक 15 ब मधील वातावरण बिहार सारखे झाले आहे का.?असे नागरिक बोलू लागले आहे.? त्यामुळे पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बारामती शहरातील पोलीस प्रशासनाकडून तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून हे गैरप्रकार तात्काळ रोखणे गरजेचे आहे.काही अनुचित आणि गैरप्रकार घडू नये बारामती नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत गालबोट लागू नये यासाठी तात्काळ कारवाई करून चुकीचे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे. प्रभागातील स्थानिक नागरिक बोलू लागले आहेत बारामती पोलिसांकडून प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये सकाळपासून फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारांचा वावर पाहता त्यांना प्रभागात फिरण्यास मज्जाव करण्यात यावा.त्यांचे प्रभागात दहशत माजविण्याच्या प्रयत्नात निश्चितच निष्पाप नागरिकांना त्रास होत असावा यात मात्र शंका नाही.? त्यामुळे पोलिसांनी काही अनुचित प्रकार घडण्याआधी बारामती शहरातील नगरपरिषद निवडणूक शांततेने पार पडावी यासाठी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी याकडे बारामती शहरातील प्रत्येकच प्रभागात लक्ष देणे गरजेचे आहे सराईत गुन्हेगार प्रभागात फिरून मतदारांवर दबाव टाकत आहे का.? याची देखील तपासणी करण्यात यावी कारण प्रभागात उलट सुलट चर्चा सुरू झाले आहेत.
