मेकिंग महाराष्ट्र – बारामती : सामाजिक बांधिलकी जोपासत निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने बंधन कोन्नगर संस्थेकडून रोजगार निर्मितीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या बारामती शाखेच्या दुसऱ्या टप्प्यात आज ३४ महिलांना विविध प्रकारच्या रोजगार साधनांचे वाटप करण्यात आले. यामध्ये १४ महिलांना हातगाड्या देण्यात आल्या असून उर्वरित महिलांना कपडे, चप्पल, बूट तसेच भाज्यांचे संच देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करण्यात आली.

बंधन संस्थेचा हा उपक्रम Bajaj Finserv यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून बारामती शाखेतील सुमारे २०० महिलांना आणि पुणे जिल्ह्यातील चार ब्लॉकमधील एकूण २००० महिलांना मोफत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

किराणा साहित्य, कपडे, बागरी, चप्पल, सुखद भूमी उत्पादने, नारळ पाणी, चहा व नाश्ता आदी विविध प्रकारचे लघुउद्योग उपलब्ध करून देत महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी दिली जात आहे. या उपक्रमासाठी बजाजकडून आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शैल चिवड शेट्टी पोलीस निरीक्षक, बारामती, तसेच पोलीस कर्मचारी ओबासे, संजय वाघमारे, वैष्णवी गायकवाड उपस्थित होते. बंधन संस्थेच्या जिल्हा प्रभारी अमृता घोष, एरिया इन्चार्ज योगेंद्र कुमार, व्यवस्थापक विकास कुमार, तसेच कर्मचारी सुरज व आयेशा सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार असून स्वावलंबनास चालना मिळणार आहे. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
