निवडणूक तोंडावर आल्याने सरतापवाडी पंचायत समिती इच्छुक उमेदवार निखिल कांचन यांच्या उमेदवारीला मतदारांची पसंती.!

उरुळी कांचन (प्रतिनिधी)-हवेली तालुक्यातील सोरतापवाडी पंचायत समिती गणात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगत आहे विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जनसंपर्कात व्यस्त असताना तरुण नेतृत्व म्हणून निखिल कांचन यांच्या उमेदवारीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे स्थानिक विकास कामांबाबत दूरदृष्टी युवकांची संवाद साधण्याची हातपोटी आणि सर्व समाज घटकांना समान वागणूक देणारी त्यांची कार्यपद्धती यामुळे मतदार वर्गात त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे ग्रामविकास, शैक्षणिक रोजगार आणि पायाभूत सुविधा या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे निखिल कांचन हे आगामी निवडणुकीत प्रभावी उमेदवार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत गावोगावी त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून तरुण मतदार वर्ग त्यांच्या मागे निष्ठेने एक वाटताना दिसत आहे स्थानिक राजकीय समीकरणे आणि मतदारांची या इच्छुक उमेदवाराला पसंती मिळत असल्याची पाहून निवडणुकीत निखिल कांचन यांच्या विरोधात इतर उमेदवारांना कठीण लढत द्यावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.