दौंड तालुका चौफुला कला केंद्रात गोळीबार:” डान्स करणारी तरुणी जखमी.?

पुणे मेकिंग महाराष्ट्र- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये चौफुला येथे एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दौंड तालुक्यातील चौफुल्याच्या तीन कला केंद्रांपैकी कोणत्या कला केंद्रात गोळीबार झाला, याबद्दल पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. या गोळीबारात डान्स करणारी तरुणी जखमी झाल्याची चर्चा संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये सुरू आहे. पोलिसांकडून घटनेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती स्पष्ट केली जात नसून या घटनेला दुजोरा दिला जातो की काय? “, पुणे ग्रामीण भागातील अनेक कला केंद्रांवर सराईत गुन्हेगार येत असल्याचा देखील बोललं जात आहे. यामध्ये अनेकदा बेकायदेशीर कमरेला पिस्टन लावून कला केंद्रांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचं संबंधित कला केंद्रातील काही कामगारांकडून त्यांच्या माहितीनुसार आमच्या प्रतिनिधींना सांगितल्या गेलं आहे.त्यामुळे अनेक कला केंद्रांवर नृत्य कला करून आपली उपजीविका चालवत असलेल्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे यापुढे कलाकेंद्रांवर पोलीस प्रशासन कशाप्रकारे अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करेल हे आता पाहणे गरजेचे आहे.मात्र दौंड तालुक्यातील चौफुला दोन ते तीन कला केंद्रातील सीसीटीव्ही पोलिसांनी अधिक चौकशी साठी तपासणीला घेत आहेत. पुढील घटनेचा तपास दौंड तालुका पोलीस करीत आहे.