मळद येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.!

शिव शंभू व्याख्याते राकेश सरकार यांचे स्वराज्याच्या व्यापक विचारांवर भाष्य.!

मेकिंग महाराष्ट्र – मळद (ता. बारामती) येथे 19 फेब्रुवारी 2026 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शिव शंभू व्याख्याते राकेश सरकार यांनी स्वराज्याच्या व्यापक आणि सर्वसमावेशक विचारांवर प्रभावी भाष्य केले.

राकेश सरकार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना अठरा पगड जातींना विश्वासाने सोबत घेतले. ‘आपण सगळे एका आईची लेकरं आहोत’ हा त्यांचा व्यापक विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. ज्या महान व्यक्तिमत्त्वामुळे देव्हाऱ्यातील देव, गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.” त्यांनी सांगितले की, या विशाल विचारांचे घराघरात मंथन होणे अत्यंत आवश्यक आहे.

कार्यक्रमास बारामती नगर परिषद चे नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव, राष्ट्रवादी काँग्रेस चे नितीन कुमार शेंडे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक शहाजी काका गावडे, जेष्ठ नेते रामचंद्र मदने, तसेच राजकुमार पोतेकर, धनंजय गवारे, लालासाहेब गावडे, अजित उलगडे, प्रितम परकाळे, अनिल कदम, किशोर शिंदे, बबन शिंदे, अमोल पवार, विकास चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष मयूर वाबळे, सरपंच योगेश ढमाळ, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, आद्य क्रांतीवीर राजे ऊमाजी नाईक, अण्णा भाऊ साठे आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मनोज शिंदे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांवरील भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.मळद गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा झाला.