मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) इंदापूर – इंदापूर शहरातील पुणे सोलापूर बाह्यवळण मार्गावर हॉटेल जगदंबा येथे जेवणासाठी थांबलेल्या एकावर अज्ञात पाच ते सहा जणांनी गोळीबार करीत कोयत्याने वार केल्याची घटना घडली असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश बाळू धनवे (रा. आळंदी) असे मृताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या गोळीबार व हल्ला प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने हॉटेल परिसरात मोठी गर्दी झाली होती याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार (ता.16) रोजी सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान एका चारचाकी गाडीमध्ये आळंदी येथील अविनाश धनवे व अन्य तिघे असे चौघे इंदापूर शहरातील बाह्यवळण वर असलेल्या हॉटेल जगदंबा येथे जेवणासाठी थांबले.त्यानंतर ते हॉटेल मध्ये जाऊन बसले असतानाच पाठीमागून दुसऱ्या चारचाकीत गाडीत आलेल्या अंदाजे पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी अविनाश यांचेवर गोळीबार करीत कोयत्याने वार केल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार कोणत्या वादातून झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.दरम्यान इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली. तपास सुरू केला.अविनाश धनवे हा सराईत गुन्हेगार असुन आळंदीत कोयता गॅंगचा म्होरक्या होता. आळंदीत गेली पंधरा वर्षापासून ही गॅंग अॅक्टिव्ह आहे. धनवे याच्यावर आळंदी भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. येरवडा कारागृहातही कैद्यासोबत यापुर्वी मारामारी केली होती. अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून सांगण्यात आलेली आहे.
