मेकिंग महाराष्ट्र- जेजुरी : जवळपास एक वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर जेजुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी महामार्ग विस्तार करण्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हलविण्यात आला होता. तेव्हापासून सातत्याने या पुतळा उभारणीच्या कामासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती जेजुरी चे सर्व सदस्य व आंबेडकर अनुयायी यांनी विशेष प्रयत्न करून पुर्णकृती पुतळ्यासाठी व सुशोभीकरणासाठी हिरवा कंदील दाखवला व परवानगी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे अंदाजे बजेट जवळपास दोन कोटी रुपये इतके आहे.
या स्मारकाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम 14एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी नारळ फोडून उदघाट्न केले. परंतु आज खऱ्या अर्थाने ज्या जागेवर पुतळा उभारायचा आहे त्या ठिकाणचा चौथरा उभारण्याचे काम सुरु केले आहे.जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांनी व पंकज धिवार यांनी नारळ फोडून, पाच टिकावं टाकले व कामाचा शुभारंभ केला यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम भालेराव, सचिव पंकज धिवार, खजिनदार भगवान डिखळे, उपाध्यक्ष दादा भालेराव, सदस्य प्रमोद डिखळे ,पंढरीनाथ जाधव, दिपक भालेराव सारंग स्वप्नील भालेराव प्रशांत नाझरेकर विजय भालेराव विशाल डिखळे ओंकार डिखळे राजेश भालेराव राज डिखळे तसेच समस्त डिखळे भालेराव पै पाहुणे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
