बारामतीत दारू पिताना काही अंतरावर बसलेल्या दोन गटांत बाचाबाचीवरून एकावर जीव घेणा हल्ला

मेकिंग महाराष्ट्र – बारामती, दि.२०. ही घटना १२नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेली असून सदर घटनेची हकीकत अशी आहे की बारामती जवळील वंजारवाडी परिसरातील वनक्षेत्रात दारू पिताना दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाण झाली. दोन्ही गट काही अंतरावर बसलेले असताना बोलाचाली सुरू झाली आणि त्याचे रूपांतर दगड, हात व बुक्क्यांनी हाणामारीत झाले.या मारहाणीत गणेश लोणकर या व्यक्तीस छाती, पाठ व खांद्यावर कापिव जखमा झाल्या असून त्याच्या अंगावर धारदार हत्याराने हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

“,,,संबंधित घटनेतील आरोपी हे पेशाने शिक्षक असून ते परप्रांतीय देखील आहेत ते बारामतीतील एका प्रसिद्ध अकॅडमी ला शिक्षकाची नोकरी करत असल्याचे समजते,” असे कृत्य करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार विद्यार्थ्यांवर याचा वाईट परिणाम होईल,” असे बारामतीतील सुज्ञान नागरिक चौका चौकात चर्चा करू लागले आहेत. त्यामुळे संबंधित अकॅडमीतील, पेशाने शिक्षक जरी असले तरी ते आरोपीच आहेत. त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी आता बारामतीत जोर धरू लागली आहे…

या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अनोळखी आरोपींविरूद्ध तक्रारीही दाखल केल्या होत्या. या घटनेतील फिर्यादी संतोष पोपट जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून. पोलिसांनी सखोल घटनेची चौकशी केली. यामध्ये काही बारामती वंजारवाडी मालुसरे वस्ती येथील, संशयित आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामध्ये, विकी साबळे आणि सोन्या यादव याचे नाव, समोर येत होते. परंतु ती नावे संशयित आरोपी म्हणून समोर येत होती.त्यामधील एका आरोपीस म्हणजेच विकी साबळे यास, तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन फिर्यादी संतोष जाधव यांच्यासमोर उभा केल्यानंतर त्याने हा आरोपी नसल्याचे पोलिसांसमोर कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास अगदी जलद गतीने सुरू केला आणि चार दिवसांमध्ये, मुख्य आरोपींना अटक करून सर्व प्रकार समोर आणला. घटनास्थळी असलेल्या संतोष जाधव आणि त्याचा साथीदार, साहिल साळवे, यांना पोलिसांनी तपास कामी पोलीस ठाण्यात बोलवून, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी सुशील कुमार मिश्रा,भूपेंद्र सिंग आणि लोकेश दरपे मूळ राहणार राजस्थान. सध्या राहणार बारामती, या आरोपींची ओळख पटवण्या कामी संतोष जाधव व त्याचा मित्र, साहिल साळवे यांना सांगितले त्यावरून त्यांनी हेच आरोपी आहेत. असे पोलिसांना तात्काळ सांगितले पोलिसांनी तीनही आरोपींना तपास कामी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी यांनी सदर घटनाक्रम सांगून गुन्हा कबूल केला. आणि मग तीनही आरोपी निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहितेचे कलम.११८(२) ३(५ ) आणि वाढीव कलम BNS.१०९ जीव मारण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात अटक करण्यात आली.ही घटना वंजारवाडी चे जवळ असलेल्या, हॉटेल सोमनाथ समोरील वनविभागाचे जमिनीचे शेजारी घडली.असून या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेऊन बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या घटनेची विशेष दखल घेत तपास वेगाने सुरू केला. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील निरीक्षणे आणि मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल ,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस कर्मचारी चव्हाण,सुरेंद्र वाघ ,भारत खारतोडे ,मनोज पवार ,यांनी केली आहे.