बारामती पोलिसांकडून  31 डिसेंबरच्या अनुषंगाने कारवाई करण्यास सुरुवात,, ड्रंक अँड  ड्राईव्ह मध्ये 40 ते 45 जणांवर कारवाई..

  • मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- बारामती शहरातील तसेच मुख्य रस्त्यांवर 31 डिसेंबरच्या अनुषंगाने कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त, ठेवण्यात आलेला आहे तरी हा बंदोबस्त आज पासून एक जानेवारी 2024 पर्यंत राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे .येणारे नववर्षाचे स्वागत उत्साहात करावे. परंतु 31 डिसेंबर व एक जानेवारी या नववर्षाचे स्वागत करत असताना व तो साजरा करत असताना आनंदाचा अतिरेक  होऊ नये याची खबरदारी घ्यावी यामध्ये  ड्रंक अँड ड्राईव्ह, हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेलमध्ये बसून मध्यपान करण्यास ग्राहकांना बंदी घालने, तसेच टुकार मुले व गुन्हेगारी पार्श्वभूमीची रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना देखील पोलिसांनी तंबी दिलेली आहे.
  • रस्त्यावर चौका चौकात थांबलेल्या, तसेच टी सी कॉलेज रोड येथे थांबलेल्या मुलांना देखील पोलिसांनी समजावून सांगत त्यांचे समुपदेशन केलेले आहे. त्यामुळे येणारे नववर्षाचे स्वागत हे शांतते व कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशा प्रकारे साजरा करावा असे बारामतीतील नागरिकांना पोलिसांकडून आव्हान करण्यात आलेले आहे. जागोजागी नाकाबंदी करून गाड्यांची झडती देखील घेण्यात येत आहे यामध्ये जर गाड्यांमध्ये हत्यारे आढळल्यास कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे. तसेच चायनीजचे गाडे असतील  पाना टपरी असतील यांची देखील झडती घेण्यात येणार आहे.
  • त्यामुळे बारामतीतील व्यावसायिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे जर कोणी टुकार मुले व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हेगार हॉटेल व्यवसायिकांना किंवा बारामतीतील नागरिकांना त्रास देत असतील, त्यामध्ये दारूच्या नशेत कोणाला मारहाण करत असतील ,धमकावत असतील आणि हत्यारे घेऊन रस्त्याने फिरताना असताना आढळले तर बारामती पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधा संपर्क क्रमांक. मो.9011960200, – डायल.112 यावर फोन द्वारे माहिती देऊ शकता . त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पुढील दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत बारामतीतील पोलीस सज्ज झाले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पत्रकारांच्या माध्यमातून आव्हान देखील नागरिकांना केले आहे.
  • महत्त्वाचे म्हणजे युवकांनी तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हेगार जर.चुकीचे कृत्य करताना आढळल्यास गुन्हे दाखल तर होणारच परंतु, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई व मकोका अंतर्गत सारखे कारवाई देखील होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.