
मेकिंग महाराष्ट्र – बारामती : बारामती नगर परिषद मार्फत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) अंतर्गत पथविक्रेते “लोक कल्याण मेळावा ” यांचा आयोजित केला होता.सदर मेळाव्यात पथ विक्रेते यांना शासनामार्फत मिळणाऱ्या कर्जबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला बारामती नगर परिषद समिती सदस्य फैयाज शेख,शुभम अहिवळे, असिफ शेख व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बारामती नगर परिषद पथविक्रेता समिती सदस्य गौरव अहिवळे यांनी बोलताना सांगितले की बारामती नगर परिषदेने पथविक्रेते यांची नोंदणी करावी तसेच त्यांना हक्काची जागा देऊन आत्मनिर्भर करावे.नाही तर कर्ज दिल्यानंतर पथ विक्रेते यांच्यावर कारवाई झाली तर पथ विक्रेते कर्जबाजारी होतील.अशी परिस्थिती होऊ देऊ नका असे नगरपरिषद प्रशासनाला मेळाव्याच्या माध्यमातून सांगितले. पथविक्रेता समिती सदस्य शुभम अहिवळे, फैयाज शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले की आम्ही पथविक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार आहोत.
