बारामती मधे मोठ्या प्रमाणात लपून-छपून मटका व्यवसाय सुरू ;- पहा व्हिडिओ..

बारामती : मेकिंग महाराष्ट्र वृत्त : पुणे जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाहीत, याबाबत माझा कटाक्ष आहे.ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निष्पन्न होईल, त्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला होता.नारायणगाव (ता.जुन्नर) येथे देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधला होता.त्यावेळी ते बोलले होते परंतु बारामती मध्ये राजरोजपणे मटका तसेच अवैद्य देशी हातभट्टी व्यवसाय सुरू असून त्याचा व्हिडिओ हाती लागल्यानंतर तो बातमीच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. मागील बातमी मध्ये यासंदर्भात बातमीच्या माध्यमातून अवैध धंदे मटका व्यवसाय सुरू असल्याचे सांगण्यात आले होते परंतु याकडे गांभीर्यपूर्वक दखल घेण्यास टाळाटाळ केलेली होती त्यामुळे अशा अवैध धंद्यांकडे पोलिसांनी पाठ फिरवलेली दिसत आहे संबंधित परिसरामध्ये राजरोजपणे अवैधरित्या मटका व्यवसाय
कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे अशी चर्चा आता बारामतीतील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.