अखेर बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मच्छिंद्र टिंगरे याच्यावर खंडणी सारखा गंभीर गुन्हा दाखल..

  • मेकिंग महाराष्ट्र प्रतिनिधी दि-6- फिर्यादी शेखर खोमणे वय 37 व्यवसाय नोकरी बारामती जि पुणे.सुपा पोलीस स्टेशन येथे वरील ठिकाणी हे त्यांच्या परीवंरासह एकत्र राहणेस असुन फिर्यादी वसंतराव पवार मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह येथे अधिक्षक या पदावर काम करतात त्यांचा पुतन्या यश खोमणे हा गेले दोन वर्षापुर्वी चुलते शेखर खोमणे यांच्याकडे राहण्यास होता व तो बारामती येथील एका हॉस्पीटल येथे लॅबमध्ये जावुन- येवुन काम करत होता. पुतन्या यश याचे एका मुलीशी प्रेम संबंध होते हे यशच्या चुलत्याला गेले सहा महिन्यापूर्वी पुतन्या यश याचे कडुनच समजले होते. त्यानंतर सदर मुलगी व तिचे आई ,वडील हे यश यास लग्न करण्यासाठी वारंवार सांगत होते परंतु पुतन्या यश याचे या लग्नास माझा भाऊ नवनाथ खोमणे व भावजय मनिषा खोमणे यांचा नकार होता.त्यानंतर पुतन्या यश याचे सांगणेवरुन त्याचा साखरपुडा जुलै 2023 रोजी एका दुसऱ्या मुलीशी तिच्या  समतीने झाला होता व त्याचे लग्न तारीख
    8/12/2023 रोजी ठरल्या प्रमाणे दुसऱ्या मुली सोबत झाले लग्न झाल्याची माहिती पहिले प्रेम संबंध असलेल्या मुलीला समजताच तिने दिनांक 31/12/2023 रोजी पुतन्या यश याचे विरुद्ध बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला  पुतन्या यश हा सध्या जेल मध्ये आहे. दिनांक 30/12/2023 रोजी रात्री 08-00 वा. सुमारास बारामती शहर पोलीस स्टेशन येथे पाहुणे अमर शिरतोडे रा. फलटण यांचे ओळखीचे श्री.मच्छिंद्र टिंगरे त्या ठिकाणी सदर प्रकरणात आले. त्यांनी मला व महिला भावजय खोमणे यांना  प्रकरणातुन बाहेर काढतो असे सांगुन त्यांचे मळद रोडवरील येथे देवळे पॅराडाईज फ्लॅटवर नेवुन दोन दिवस
    तेथे दोघाना बसवुन आतुन कडी लावली होती व. गुन्हा नोंद व्हायचा आधी मच्छिंद्र टिंगरे हे म्हणायचे की, एक तर मुलीशी लग्न करा किंवा टु बीएचके फ्लॅट पॉश एरिया मध्ये घेवून दया असे मच्छिंद्र टिंगरे यांनी वांरवार तगादा लावत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पहाटे चार नंतर टिंगरे हा आम्हाला म्हणायचा की, तुम्हाला जर यातुन बाहेर पडायचे असेल तर वकीलाची फी दीड लाख रुपये तसेच पोलीस तपास अधिकारी यांचे कलेक्शन करणारे पोलीस यांना अटकपूर्व व नोटीस साठी तीन लाख रुपये दयावे लागतील. असे मच्छिंद्र टिंगरे म्हणाला तसेच माझे व पोलीस खात्याचे संबंध चांगले असल्यामुळे तुम्ही चार लाख पन्नास हजार रुपये जमा करताच तुमची यातुन सुटका होईल नाहीतर तुम्हाला जेल मध्ये बसावे लागेल अशी धमकी देवून मच्छिंद्र टिंगरे वांरवार चार लाख पन्नास हजार रूपये खंडणी मागत होते. परंतु त्यांना पैसे न पोहचल्या मुळे मच्छिंद्र टिंगरे याने यश याचे सासरवाडीकडील नातेवाईक यांचे गावी जावुन यशवर बारामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन तुम्ही यश याचे घरच्यांशी संबंध ठेवु नका तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या घरी घेवून या यश आता लवकर बाहेर येत् नाही. तुम्ही तिचा घटस्पोट घ्या, अशी चुकीची माहिती मच्छिंद्र टिंगरे यांनी दिली. या सर्व प्रकरणामुळे फिर्यादीच्या सांगण्यावरून यशचे नातेवाईक आमचेवर नाराज आहेत तरी आम्हास मच्छिंद्र टिंगरे याचे पासुन धोका आहे. मच्छिंद्र टिंगरे यांच्या राजकीय तसेच इतरत्र ठिकाणी मोठमोठ्या लोकांशी संबंध आहे व त्याच्या या दशहती मुळे  मच्छिंद्र टिंगरे यांच्या विरुद्ध तक्रार देत असल्याचे सांगितले त्यामुळेदिनांक 30/12/2023 रोजी रात्री 08/00 वा. सुमारास बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मच्छिंद्र टिंगरे यांनी मला व भावजय खोमणे यांना तुम्हाला या प्रकरणातुन बाहेर काढतो असे सांगुन त्यांचे मळद रोडवरील देवळे पॅराडाईज फ्लॅटवर नेवुन तेथे फिर्यादी व त्यांच्या भावजय असे मिळून दोघाना दिनांक 30/12/2023 रोजी रात्री 09/00 वा. ते 1/01/2024 रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत बसवुन आतुन कडी लावून फिर्यादीस मच्छिंद्र टिंगरे मनाला की एक तर मुलीशी लग्न करा किंवा टू बीएचके प्लॅट पॉश एरिया मध्ये घेवून दया असे वांरवार तगादा लावला. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पहाटे 4 नंतर मच्छिंद्र टिंगरे यांनी फिरलेला पुन्हा  चार लाख पन्नास हजार रुपये जमा करताच तुमची यातुन सुटका होईल नाहीतर तुम्हाला जेल मध्ये बसावे लागेल अशी धमकी देऊ लागला व वारंवार चार लाख पन्नास हजार रूपये खंडणी मागणी करू लागला म्हणून फिर्यादी यांनी  मच्छिंद्र टिंगरे रा. झारगडवाडी ता. बारामती, जि. पुणे याचे विरूध्द. कलम.384, 385,342,506 नुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून.सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करीत असल्याचे प्राथमिक माहिती समजते..