हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना दिली संविधानाची प्रत.

मेकिंग महाराष्ट्र- हडपसर (प्रतिनिधी)- आज हडपसर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या कार्यकाळात हडपसर परिसरात गुन्हेगारीला आळा बसण्यास अतिशय निष्ठेने काम करत परिसरातील नागरिकांना मदत झाली.तसेच या परिस अनेक जाती धर्माचे नागरिक असुन सुद्धा एकदाही अनुचित प्रकार

घडला नाही.त्यामुळे दलित पँथर संघटना शेवाळेवाडी शाखा व हडपसर शाखा यांच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी दलित पॅंथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (पथारी ) आबा शिंदे , महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ साळवे , युवा नेते पप्पू भाऊ रोकडे , पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश आग्रवाल,पुणे शहर कार्यधक्ष अमर गाडे व किरन कांबळे, सचिन कांबळे,उपस्थित होते.