पुणे : विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे आज सेवानिवृत्त झालेत. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या भोसले यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अगदी जाताजाता ही त्यांनी नवीन आयुक्त येण्यापूर्वी मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नये असे संकेत असताना ही घाईघाईने मलईदार विषय ,टीडीआर यांचे शेवटच्या दिवशी ही निर्णय घेतल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने महापालिकेसमोर ते निवृत्त झाल्याबद्दल रागाने फटाके फोडले आणि पेढे वाटले आहेत गेले दोन महिने भोसले यांनी अनेक कोट्यावधी रूपयाचे वादग्रस्त टेंडर काढल्याने हे सगळे टेंडर रद्द करण्याची मागणी भाजपच्या उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती . त्यामुळे वादग्रस्त आयुक्त ठरलेल्या भोसलेंच्या निवृत्तीनिमित्त महापालिकेसमोर फटाके फोडून पेढे वाटण्यात आलेत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे आयुक्त महापालिकेतून गेल्याचा आनंद साजरा करण्यात आलाय आता नवल किशोर राम हे प्रधानमंत्री कार्यालायातून आलेले अधिकारी पुणे मनपाचे आयुक्त असणार आहेत. यापूर्वी ते पुण्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत. 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांच्यावर पुण्याच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आत्तापर्यंत नवल किशोर राम यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं असून खुद्द पुणे जिल्ह्यातदेखील त्यांनी आव्हानात्मक अशा करोना काळात जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

