मेकिंग महाराष्ट्र – बारामती : (दि:19 )- विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मागील नऊ वर्षांपासून जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला जात आहे. यंदा शंभर मुलांना, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी एम. पी. सय्यद, ॲड.अमोल सोनवणे, गणेश जोजारे, विपुल आण्णा ढवाण पाटील, संदेश गालिंदे, संदिप पिंटू बनकर, निलेश आप्पा इंगुले, पत्रकार तैनूर शेख, पत्रकार सुरज देवकाते, कांबळे गुरुजी, पत्रकार गौरव अहिवळे, विक्रम लांडगे, अण्णा गालिंदे,जमीरभाई सय्यद, सचिन सोनवणे, पत्रकार मन्सूर शेख, पत्रकार शुभम अहिवळे, माजी नगरसेवक विजय खरात, आरपीआय अध्यक्ष संजय वाघमारे, फिरोज भाई सय्यद, अमित सोनवणे,शरद सोनवणे,आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समिती संस्थापक योगेश महाडिक व पदाधिकारी चैतन्य गालिंदे, समीर शाह, अमिन अन्सारी ,रंजीत मोतीकर, सचिन बचाव,निखिल शिलवंत, महावीर गायकवाड, सुरज नवले, आशपाक शेख सलमान खान,इरफान बागवान, वसीम दाजी बागवान आदींनी सहकार्य केले.
