व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सुरज देवकाते यांची निवड…!

मेकिंग महाराष्ट्र- बारामती. दि 19

पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीमध्ये सुरज बाळू देवकाते यांची “व्हॉईस ऑफ मिडिया” या पत्रकार संघटनेच्या (डिजिटल मीडिया विंग) बारामती तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.

पत्रकारिता क्षेत्रांमध्ये मिळवलेली मास्टर्स ऑफ जर्नालिझम ची डिग्री तसेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये  निर्भीडपणे केलेले काम व अनुभव पाहता त्यांची बारामती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

व्हॉईस ऑफ मिडिया (डिजिटल मीडिया विंग) चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या सूचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, कार्याध्यक्ष अशोक घावटे, पुणे जिल्हाध्यक्ष अमीन गोरे, उपाध्यक्ष अश्विनी पुरी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढा उभारणार असल्यासाचे व्हॉईस ऑफ मिडिया डिजिटल मीडिया विंग चे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुरज देवकाते यांनी सांगितले