मेकिंग महाराष्ट्र बारामती (प्रतिनीधी) दि १६- .बारामती कऱ्हावागज येथे तिघांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मॅनेजर व कामगारावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आमच्या गावात हॉटेल चालवून आम्हाला नडतो, तुला आता सोडणारच नाही, असे म्हणत हा हल्ला केला. कऱ्हावागज गावच्या हद्दीतील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह येथे मंगळवारी दिनांक 14 या रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांना माळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे (दोघेही रा.कऱ्हावागज, ता. बारामती) व
निखिल उर्फ (भाई) अशोक खरात (रा.आमराई, बारामती, ता. बारामती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड (मूळ रा. कडा, ता., आष्टी, जि. बीड सध्या रा. हॉटेल शारदा बार अँड लॉजिंग कऱ्हावागज, ता. बारामती) व दिनेश वर्मा (मूळ रा. उत्तर प्रदेश) असे हल्ला झालेल्या दोघांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीच्या पहाटे १.४५ वाजता शारदा हॉटेलचे कर्मचारी मॅनेजर हॉटेल बंद करून झोपण्यासाठी गेले होते.यावेळी गावातील विशाल मोरे, संदेश शिंदे व निखिल ( भाई ) खरात हे तिघे आले. हॉटेल मधील रूममध्ये घुसून शिवीगाळ करीत मिंड यांना दारू देत नाहीस का आमच्याच गावात हॉटेल चालवून आम्हालाच नडतो काय? आता तुला सोडत नाही.आता तू आम्हाला नड,असे बोलून मारहाण करून खाली पाडले.निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेल्या धारदार शस्त्राने मिंड यांच्यावर हल्ला केला. या घटनेत मिंड यांच्या पायावर जखम जाहली.हॉटेलमधील कामगार दिनेश वर्मा हा मिंड याला वाचविणे करिता मध्ये आला आणि निखिल खरात याने त्याच्याजवळ असलेले धारदार शस्त्र दिनेश वर्मा याच्या पोटात खुपसला तसेच इतर कामगारांवर देखील धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर हे तिघेही चारचाकी वाहनातून पळून गेले. दरम्यान,या घटनेबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर माळेगावचे सहाय्यक निरीक्षक सचिन लोखंडे यांनी फौजदार देविदास साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिघांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पहाटेच्या वेळी हडपसरच्या गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतले आहे. तरी वरील तीन आरोपींपैकी दोन आरोपी सराईत असल्याच देखील बोललो जात आहे , त्यांच्यावर बारामती शहरासह तालुक्यात देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून समजते. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, फौजदार अमोल खटावकर, देविदास साळवे, पोलीस अंमलदार, राहुल पांढरे,विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे,नंदकुमार गव्हाणे,अमोल राऊत,सागर पवार,जयसिंग कचरे,अमोल कोकरे यांनी केली.
