गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांकडून शांतता कमिटीचे आयोजन;,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ज्यांच्याकडून गणेश मंडळांना मोलाचे मार्गदर्शन.!

मेकिंग महाराष्ट्र दि.६ अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ज्यांच्याकडून गणेश मंडळांना मोलाचे मार्गदर्शन झाले. बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच अनेक विभागातील विविध प्रश्नांचा अभ्यास करुन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बारामती शहरातील नवनिर्वाच अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची थोडक्यात माहिती. या पूर्वी दौंड येथे एसआरपीएफ मध्ये समादेशक म्हणून काम केले आहे. नागपूर व पिंपरी चिंचवड येथे पोलिस उपायुक्त म्हणून ते कार्यरत होते. त्या अगोदर गडचिरोली, सिल्लोड व इचलकरंजी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्या अगोदर प्राथमिक शिक्षक व तलाठी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सन 2011 मध्ये ते राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. पत्रकारितेचाही पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला असून कायदयाचीही पदवी त्यांनी घेतली आहे. पोलिस महासंचालकांचे पदक,राज्य शासनाचे विशेष सेवा पदक त्यांना मिळाले असून लडाख येथे हॉट स्प्रिंग सन्मानचिन्हाचे ते मानकरी आहेत.केंद्र शासनाचे अंतर्गत सुरक्षा सेवापदकही त्यांना प्राप्त झाले आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन देखील केले.

शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखवली, या बैठकीमध्ये बारामती शहर पोलीस स्टेशन स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले कि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असतात, या गणेश उत्साहावेळी पोलीस प्रशासन योग्यती काळजी घेते. यामध्येच जर कोणी चुकीचे कृत्य करताना आढळला किंवा कायद्याचे पालन केले नाही तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाकडून साऊंड,लाऊड स्पीकर लावण्यासाठी सर्वच मंडळांनी परवानगी घेणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे परवानगी नसेल त्याचे लाऊड स्पीकर आम्ही बंद करू. त्यामुळे सर्वच मंडळांनी या संदर्भात काळजी घ्यावी असे पोलीस निरीक्षक नाळे यांनी मंडळाचे पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, नवनिर्वाचित अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, महावितरण कंपनीचे नवनिर्वाचित अधिकारी वैभव पाटील, आणि निवडणूक नायब तहसीलदार पुनम दंडिले, हे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्याचप्रमाणे बारामती शहरातील जवळपास 40 गणेश मंडळांनी शांतता कमिटीमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या पोलीस प्रशासनापुढे मांडल्या. पोलीस प्रशासनाने योग्य तो पर्याय काढू असे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी संदर्भात माहिती देत सांगितले की जलकुंड उभारल्यानंतर गणपती विसर्जन जलकुंडातच करावे. काही गणेश भक्तांचे म्हणणे आहे की वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी काही उपाययोजना करा परंतु यावर कॅनॉल इरिगिशन यांच्याशी आम्ही चर्चा करून यावर काही मार्ग निघू शकतो का हे बघूया असे मुख्याधिकारी रोकडे यांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना विसर्जना संदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी वैभव पाटील यांनी गणेश मंडळाच्या वेळी, विद्युत खांबातून लाईट कनेक्शन घेऊ नये यासाठी एम एस सी बी यांच्याकडे रीतसर अर्ज करून लाईट कनेक्शन जोडून घ्यावे, बऱ्याचदा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर लाईट कनेक्शन घेण्यात येते. यामुळे मंडळासह आसपासच्या लोकांना देखील धोका निर्माण होऊ शकतो याची काळजी बारामती शहरातील गणेश मंडळांनी घ्यावी असे पाटील यांनी सांगितले.

बारामती नायब तहसीलदार पूनम दंडिले यांनी सांगितले 2024 च्या गणेश उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्वात उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्राप्त झालेल्या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरीता सन २०२३ मध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर सन २०२४ च्या गणेशोत्सवात सहभागी होणा-या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे असे दंडिले यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी गणेश मंडळांना ठणकावून सांगत गणेश मंडळांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैर कृत्य करताना आढळल्यास. म्हणजेच जुगार खेळताना, लूडो गेम खेळताना, किंवा मंडळामध्ये मद्यपान करत बसलेल्या, बदमाश लोकांना अशी कृत्य करताना आढळल्यास मी सोडणार नाही स्थापन केलेल्या गणपती मंडळावर कारवाई करण्यात येईल आणि महत्त्वाचं म्हणजे गणेश मंडळांमध्ये डीजे चा वापर करू नये असे देखील राठोड यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. बारामती शहरासह तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करावे अशी. उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी आपल्या खास शैलीत बैठकीला उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समजावले.