मेकिंग महाराष्ट्र बारामती: दि २७ – बारामती शहरातील बस स्थानकातील पार्किंग जवळ.थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरासा.बारामती शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.फिर्यादी महिलाही फलटण येथून बारामती बस स्थानकावर उतरल्यानंतर बस स्थानकाच्या पार्किंग येते थांबली असताना.चोराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी चोरास पकडले.आणि फिर्यादी महिलेच्या गळ्यातील अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे सोने चोरी होण्यापासून वाचविले.पोलीस तपासामध्ये आरोपीचे नाव.कुमार सुभाष खंडागळे. वय वर्ष 34 राहणार- दहिफळ ता.कळंब.जि.धाराशिव येथील असून सध्या तो बारामती वसंत नगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.बारामती बस स्थानकामध्ये. आज घडलेल्या प्रकारामुळे त्या ठिकाणी थोड्यावेळापुरते भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नवनिर्वाचित बारामती बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.चोरांवर पाळत ठेवण्यासाठी काही सिविल ड्रेस वर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.या ठिकाणी चोऱ्या होण्याचे कारण पोलीस कर्मचाऱ्यांचा अपुरा स्टाफ कारणीभूत असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. बारामती शहरातील महाराष्ट्रात नव्हे तर देशात नावाजलेल्या.आणि सतत गजबजलेल्या बस स्थानकावर. चोरीच्या घटना घडू शकतात तर. बारामती शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच काय.असे अनेक प्रश्न आता बारामतीतील नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत.आज घडलेल्या चोरी प्रकरणी आरोपी कुमार खंडागळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर.भारतीय न्याय संहिता.(BNS) कलम.३०९(५) प्रमाणे. फिर्यादी महिलेच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
