बारामती शहरामध्ये सावकारकीचा सुळसुळाट तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.!
मेकिंग महाराष्ट्र बारामती:२० बारामती शहरामध्ये सावकारकी फोपावत आहे गेल्या एक महिन्यापासून जवळपास तीन बेकायदेशीर सावकारविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असून सावकारांना मात्र कायद्याची भीती राहिलेली दिसत नाही कारण बारामती शहरांमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला देखील सावकाराचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे.मार्च 2024 ते दिनांक 20/05/2024 या दरम्यान सुरेश ननवरे.यांचा हॉटेल व्यवसाय असून त्यांनी गरजे पोटी बेकायदेशीर सावकारकी करणाऱ्या सावकाराकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले होते कर्जाचे बदल्यात सागर ननवरे यांनी 30 हजार रूपये व्याजापोटी देऊनही पुन्हा व्याजापोटी 2,25000/- रू दयावे लागतील असे बेकायदेशीर सावकार आरोपी 1) सागर गवळी रा.माळावरची देवी बारामती 2) विकास माने रो.माळेगाव ता. बारामती 3) विक्रम थोरात रा. एम.आय.डी.सी.जळोची रोड बारामती. यांनी सागर यांना सांगितले त्यानंतर. व्याज देत नाही म्हणून सुरेश ननवरे यांची मारूती सुझुकी सेलेरिओ एम.एच. 12 एम. एम. 9690 ही जबरदस्तीने घेवून गेले तरीदेखील सुरेश ननवरे हे व्याज देत नाहीत म्हणून पुन्हा त्यांना दिनांक 20/05/2024 रोजी दिवसभर त्याचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांना तादुळवाडी म्हसोबा मंदीर जवळ ओढयात नेहुन गुप्त पणे बाधुन ठवेले, व त्यांना दमदाटी शिवीगाळ मारहाण केली या प्रकरणी फिर्यादी स्वाती सुरेश ननवरे यांनी.बेकायदेशीर सावकार आरोपी 1) सागर गवळी रा. माळावरची देवी बारामती 2) विकास माने रा. माळेगाव ता. बारामती 3) विक्रम थोरात रा. एम.आय.डी.सी. जळोची रोड बारामती याचे विरूध्द. बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्या अनुषंगाने बारामती शहर पोलिसांनी
महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार तसेच सागर ननवरे यांचे आरोपींनी अपहरण करून त्यांना मारहाण,दमदाटी व त्यांची मोटरसायकल मोटरसायकल मालकाच्या इच्छेविरुद्ध घेऊन गेल्यामुळे.त्यांच्यावर.गु.र.नं. 640/2024 भा.द.वि कलम 342,363,365,323,504,506,34 म. सावकारी अधिनियम 39,45. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.
