मेकिंग महाराष्ट्र बारामती : दि २०- बारामती शहरातील खंडोबा नगर या परिसरात मॅजिक ग्रीन सिटी या नावाने एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ४ लाख रुपयांचे सोने अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्यात आलेले आहे. यामध्ये चार सोन्याच्या बांगड्या एकूण सहा तोळे,७० हजार रुपये किमतीचे डायमंड, एकूण ४लाख ३० हजार रुपये किमतीचे सोने फ्लॅटचा दरवाजा उघडा असताना घरामध्ये शिरून, बेडरूम येथील कपाटा मधील ड्रायव्हर उघडून वरील सर्व वर्णनांच्या वस्तू आज्ञा चोरट्यांकडून चोरण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती फ्लॅट मध्ये राहत असलेल्या शेख यांच्या कुटुंबाकडून फिर्यादीमध्ये बारामती शहर पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सर्व माहिती घेऊन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करी आहेत.
