लाडकी बहीण योजनेचे  पैसै जमा झाल्याने बारामतीमध्ये महिलांचा जल्लोष…अजितदादांनी शब्द पाळल्याने बारामतीतून २५ हजार राख्यांची भेट.!

बारामती: (दि :१६)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर या योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अजितदादांनी राखी पौर्णिमेपूर्वी योजनेतील दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन आज पूर्ण झाल्याने बारामती शहरातील महिलांनी समाधान व्यक्त करत अजितदादांना २५ हजार राख्यांची भेट पाठविली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेसाठी संपूर्ण राज्यातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलांना मिळावा, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत .बारामतीमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्वतः अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत. विशेषता बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बारामती शहरातून महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. आज लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनापूर्वी दोन महिन्यांचे या योजनेचे पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. उपमुख्यमंत्री अजित दादांनी या आश्वासनाची पूर्तता केल्याचे आज स्पष्ट झाले. अजितदादांनी महिलांना रक्षाबंधनाची ही भेट दिल्याने बारामती शहरातील महिलांकडून २५ हजार राख्या जमा करून त्या राख्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांना पाठवण्यात येणार असल्याचे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या  शहराध्यक्ष. अनिता गायकवाड व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा केल्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “बोले तैसा चाले”..याप्रमाणे नेहमीच अजितदादांनी दिलेला शब्द पाळाला आहे. आम्हा कार्यकर्त्यांना त्यांचा त्यामुळेच अभिमान आहे. अशा या कार्यकर्तबगार नेतृत्वाला आम्हा कार्यकर्त्यांसह संपूर्ण राज्यातील महिला भगिनी नेहमीच पाठिंबा देत आहेत.

                जय पाटील
(अध्यक्ष,बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस)