मेकिंग महाराष्ट्र.दि.७- सातारा वृत्त
जोरदार पाऊस पडत असल्याने साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या ठोसेघर पर्यटन स्थळासह इतर ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पर्यटनस्थळे बंद असतानाही अनेक अतिउत्साही पर्यटक पर्यटनस्थळी जात आहेत. शनिवारी पुणे येथील काहीजण ठोसेघर धबधबा पाहण्यास गेले असताना बोरणे घाटात असलेल्या मंकी पॉईंटवरून सेल्फी काढताना नसरीन अमीर कुरेशी (वय २९, रा. वारजे, ता. पुणे) ही युवती
१०० फूट खोल दरीत पडली. घटनेनंतर होमगार्ड
व स्थानिकांच्या मदतीने युवतीला बाहेर काढण्यात आले असून तिच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
