मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- पुणे : शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचे संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
शहरात झिकाचे सर्वाधिक ११ रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले आहेत. त्या खालोखाल डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात १० रुग्ण आढळून आले आहेत. खराडी ६, पाषाण ५, मुंढवा, सुखसागरनगर प्रत्येकी ४, आंबेगाव बुद्रुक, घोले रस्ता प्रत्येकी ३, कळस २, धनकवडी, लोहगाव, ढोले-पाटील रस्ता, वानवडी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. कोथरुडमधील गुजरात कॉलनी, खराडीतील शिवाजी चौक, सेनापती बापट रस्त्यावरील मंगलवाडी अशी तीन नवीन रुग्णांची नोंद शहरात गुरुवारी झाली.
कोथरूडमधील गुजरात कॉलनीतील ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा झिका तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. बाणेरमधील अथश्री सोसायटीतील एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. एरंडवणेतील ७६ वर्षीय रुग्ण आणि खराडीतील ७२ वर्षीय रुग्ण अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झाल्यानंतर त्यांचा झिका तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.
झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हे रुग्ण सहव्याधी असलेले होते. त्यांचे वैद्यकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाची मृत्यू परीक्षण समिती या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करेल.– डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
झिका वायरस चि लक्षणे काय आहेत..
लक्षणांमध्ये ताप , डोळे लाल होणे , सांधेदुखी , डोकेदुखी आणि मॅक्युलोपापुलर पुरळ यांचा समावेश असू शकतो. लक्षणे साधारणपणे सात दिवसांपेक्षा कमी असतात. सुरुवातीच्या संसर्गादरम्यान कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. गर्भधारणेदरम्यान संसर्गामुळे काही बाळांमध्ये मायक्रोसेफली आणि इतर मेंदूच्या विकृती होतात.
झिका कशामुळे होऊ शकतो.
झिका विषाणूचा प्रसार मुख्यतः संक्रमित एडिस प्रजातीच्या डासाच्या चाव्याव्दारे होतो. झिका विषाणू गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंधातून किंवा गर्भामध्ये पसरू शकतो. गर्भधारणेदरम्यान संसर्गामुळे काही जन्मजात दोष होऊ शकतात.
झिका होण्यापासून कसे रोखायचे?
झिका विषाणूपासून सर्वोत्तम संरक्षण म्हणजे घरामध्ये आणि घराबाहेर डास चावण्यापासून रोखणे, विशेषत: सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेव्हा डास सर्वाधिक सक्रिय असतात. अशा उपायांमध्ये हे समाविष्ट आहे: उत्पादनाच्या लेबलवर दर्शविलेल्या सूचनांनुसार डासांपासून बचाव करणारा वापरा. लांब बाह्यांचा शर्ट आणि लांब पायघोळ घालणे .

