मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी)- किशोर खंकाळ.पुणे शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरून तिथले जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे लागले.यावेळी सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून सनी ब्रिगेड या नावाने अनेक वर्षापासून कार्यरत असलेली संस्था या लोकांच्या मदतीला धावून आली आहे नागरिकांना यामध्ये मदतीचा हात सनी ब्रिगेड यांनी दिला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खडकी, बोपोडी, पाटील इस्टेट, मुळा रोड या भागातील पीडित नागरिकांच्या मदतीला धावून आलेल्या सनी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना दुपारच्या जेवणाचा पुरवठा अत्यंत उत्तमपणे करून त्यांना धीर देण्यात आला त्यामुळे सनी ब्रिगेड या संस्थेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
