आज पहाटेपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी आणि पुरजन्य परिस्थितीचा घेतला आढावा ;- पहा व्हिडिओ..

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी).दि २५ – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पहाटेपासूनच आपल्या कार्यालयातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर आणि सांगली येथे सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरजन्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे.सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना बचाव व मदत कार्यात कोणताही विलंब न करता लोकांना आवश्यक ती मदत लवकरात लवकर करण्याच्या सूचना अजित दादांनी दिल्या आहेत. बचावकार्यात अडसर निर्माण होऊ नये यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला हवी ती मदत राज्य शासनाच्या वतीनं पुरवण्यात येईल. असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

” महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की, आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडावं आणि प्रवास करताना सतर्क रहा राज्यशासन पूर्णतः सक्रिय आहे, तुमची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोपरी आहे.;-उपमुख्यमंत्री अजित पवार…